राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून
स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य
संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला
स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये
निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.
नाव |
जिजाबाई भोसले |
जन्म |
12 जानेवारी
1598 |
जन्मस्थान |
सिंदखेड , बुलढाणा , महाराष्ट्र
|
मृत्यू |
17 जून 1674
|
वंश |
यादव |
वडिलांचे नाव |
लखुजी जाधव |
आईचे नाव |
म्हाळसाबाई |
जिजामाता म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्म इसवी सन
12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते तर आईचे नाव म्हाळसाबाई
होते . हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या महान जाणता राजा छत्रपती
शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ मातोश्री होत्या. माहेरी त्यांनी त्यांनी
राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना
शिक्षण देण्यासाठी कामास आला.
सन १६०५ साली जिजामातांचा विवाह शहाजीराजांसोबत दौलताबाद येथे
झाला.
राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य ची संकल्पना प्रत्यक्षात
साकारण्यासाठी त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान
भिनवला, त्यांनी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला. राजमाता जिजाऊंनी
शिवरायांना राम, कृष्ण आणि भीम यांच्या गोष्टी सांगायच्या. सीतेचे हरण
करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध
करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
दुष्ट कंसाचा नाश करणारा श्रीकृष्ण किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक
पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात
असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे. अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी
शिवरायांना
दिली.
राजमाता जिजाऊंच्या अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या
जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली
आणि राजमाता जिजाऊंचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना
केली.
शिवबा लोकांच्या कल्याणासाठी लोकांचे राज्य अर्थातच
स्वराज्य स्थापन करेल तो संपूर्ण प्रजेला सुखी करेल शिवबा परत यांची
साखरी किंवा
गुलाम मी कधीही करणार नाही असा जिजाबाई निश्चय केला.
राजमाता जिजाऊंचे १७ जून १६७४ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी
रायगडच्या पायथ्याशी असलेल्या
पाचाड या गावी निधन झाले.
Khushi
उत्तर द्याहटवा