सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

सामान्य ज्ञान प्रश्नावली

सामान्य ज्ञान प्रश्नावली
चला गुणवंत होऊ

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

वचन व त्याचे प्रकार

 


Online टेस्ट सोडवा - 👇



वचन व त्याचे प्रकार

नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

 

मराठीत दोन वचने आहेत.

एकवचन

अनेकवचन

 

१  पुल्लिंगी नामाचे अनेक वचन

 

नियम : 1

आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते.

उदा :

1. मुलगा – मुलगे

           2. घोडा – घोडे

3. ससा – ससे

4. आंबा – आंबे

5. कोंबडा – कोंबडे

6. कुत्रा – कुत्रे

7. रस्ता – रस्ते

8. बगळा – बगळे

 

नियम : 2

आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.

 उदा :

1. देव – देव

2. कवी – कवी

3. न्हावी – न्हावी

4. लाडू – लाडू

5. उंदीर – उंदीर

6. तेली – तेली

 

२ स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन

 

नियम : 1

अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते.

 उदा :

1. वेळ – वेळा

2. चूक – चुका

3. केळ – केळी

4. चूल – चुली

5. वीट – वीटा

6. सून – सुना

7. गाय – गायी

8. वात – वाती

 

नियम : 2

आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.

उदा :

1. भाषा – भाषा

2. दिशा – दिशा

3. सभा -सभा

4. विध्या – विध्या

 

नियम : 3

ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते.

 

उदा :

1. नदी – नद्या

2. स्त्री – स्त्रीया

3. काठी – काठ्या

4. टोपी – टोप्या

5. पाती – पाट्या

6. वही – वह्या

7. बी – बीय

8. गाडी – गाड्या

9. भाकरी – भाकर्‍या

10. वाटी – वाट्या

 

नियम : 4

ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.

 

उदा :

1. ऊ – ऊवा

2. जाऊ – जावा

3. पीसु – पीसवा

4. सासू – सासवा

5. जळू – जळवा

अपवाद : 1. वस्तु – वस्तु 2. बाजू – बाजू 3. वाळू – वाळू

 

नियम : 5

काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.

 

उदा :

कांजीन्या

डोहाळे

कोरा

क्लेश

हाल

रोमांच

 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा