सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान ३ ते १२ जानेवारी

 


राज्यातील सर्व शाळाांमध्ये दि.3 ते 12 जानेवारी

2022 या कालावधी दरम्यान “ जिजाऊ ते सावित्री

सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा " अभियान

राबविणेबाबत

 

                  भारताच्या इतिहासात ज्याांची अमीट छाप आहे अशी दोन महत्वाची स्त्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले. छत्रपती शिवाजी महाराज याांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्यनिर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्याांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत.

                   भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाज कंटकाच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्याांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे.

 

                   स्वराज्य संस्थापक  छत्रपती शिवाजी महाराजाांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ मााँ साहेब याांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळाांमध्ये “जिजाऊ ते सावित्री -सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 

या अनुषांगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी , २०२2 या कालावधीत परिपत्रकात नमूद केलेले कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे .

 

परिपत्रकाचे वाचन करा



२ टिप्पण्या: