सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

बोधकथा : खरा शिक्षित कोण ?

 

खरा शिक्षित कोण ?

           विश्वविख्यात तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याच्याकडे एकदा दोन तरुण त्याचे शिष्यत्व पत्करण्यासाठी गेले. तो त्या दोघांनाही एका सरोवराकाठी घेऊन गेला व त्याने त्या दोघांनाही एकच प्रश्न विचारला, "तुम्हाला या सरोवरात काय दिसते?"

            पहिल्याने उत्तर दिले, "मला या सरोवरात माझे प्रतिबिंब दिसत आहे. तर दुसन्याने उत्तर दिले, "मला या सरोवरात माझ्या प्रतिबिंबाशिवाय त्यात असलेले मासे, कासवे, बेडूक इत्यादी जलचर प्राणी दिसत आहेत." 

             त्याचे तसे उत्तर ऐकून सॉक्रेटिसने पहिल्या तरुणाला शिष्य करून घेण्यास नकार दिला, तर दुसऱ्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. 

             सॉक्रेटिसचा एक मित्र त्या वेळी त्याच्याबरोबर होता. त्याने त्या पहिल्या तरुणाला शिष्य करून घेण्यास नकार दिल्याचे कारण विचारले. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, "पहिल्या तरुणाने सरोवरात पाहिले असता, त्याला फक्त त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. 

याचा अर्थ शिक्षण घेतल्यावर त्याचा उपयोग तो केवळ स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी करणार. 

          भोवतालच्या समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत, या गोष्टीचा त्याच्या मनात विचारही येणार नाही. मग अशा तरुणाला शिक्षण देण्यात मी माझा वेळ फुकट कशाला घालवू?"

    बोध : इतरांचा विचार करतो तोच खरा शिक्षित .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा