सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार

 

                                क्रियापद

 

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

 

                  क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो वाक्यातील मुख्य शब्द असतो, म्हणून त्याला मुख्य पद असे म्हणतात. तर इतर शब्दांना उपपदे असे म्हणतात.

 

क्रियापदांचे विविध प्रकार

 

सकर्मक क्रियापद

                 वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा क्रियापदाला कर्माची आवश्यकता त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.

 

उदा :

१) पक्षी मासा पकडतो.

२) गवळी धार काढते.

३) आजी गोष्ट सांगते

 

अकर्मक क्रियापद

                 वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.

क्रिया कर्त्या पासून सुरु होते व कर्त्यावर संपते

उदा :

१) तो बसला.

२) तो बागेत पडला.

३) श्रावणीला थंडी वाजते.

 

व्दिकर्मक क्रियापद

                    ज्या क्रियापदाच्या वाक्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म असतात त्यास व्दिकर्मक क्रियायपद म्हणतात.

           

उदा : 

१) मुलीने राजाला पिशवी दिली.

२) गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले.

३) आजीने नातीला गोष्ट सांगितलं.

 

उभयविध क्रियापद

                   जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अश्या दोन्ही वाक्यात वापरता येते त्यास उभयविध क्रियापद म्हणतात.

               वरील वाक्यात कापले हे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले आहे.

उदा :

१) त्याने बोट कापले. (सकर्मक)

२) त्याचे बोट कापले. (अकर्मक)

 

सिद्ध क्रियापद 

                      क्रियापदातील मुख्य धातूला सिद्ध धातू म्हणतात आणि धातूला प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद म्हणतात.

उदा : जा – जातो, कर – करतो, बस – बसतो.

 

साधित क्रियापद 

                     नाम, विशेषण, क्रियापद व अव्यय यांच्या पासून तयार होणाऱ्या क्रियापदाला साधित क्रियापद म्हणतात.

 

नामसाधित –  तो चेंडू लाथाळतो. (लाथ) पाणावले, हाताळले, डोकावले

विशेषणसाधित त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. (स्थिर) उंचावला, एकवटला

अव्यय साधित – धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली. (मागे) पुढारले, खालावले

धातुसाधित आम्ही हि मोटार मुंबईहून आणवली. (आण) मागितली, बसले

 

संयुक्त क्रियापदे (धातू साधित + सहाय्यक)

                         वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे साह्य घ्यावे लागते,

अश्या दोन शब्दांना मिळून बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद म्हणतात.

उदा :

१) मुले खेळू लागली

२) तो जात आहे.

३) हा आंबा खाऊन टाक.

 

प्रयोजक क्रियापदे

               वाक्यातील प्रयोजक क्रियापदात एखादी क्रिया कर्ता घडण्यासाठी स्वत: क्रिया जर करत बाह्यघटक नसून ती प्रेरित तो घडवून करत आणतो असेल. तर अशा क्रियापदास प्रयोजक क्रियापद म्हणतात.

१) रामू कुत्र्याला पळवितो.

२) शिक्षक मुलांना बसवितात.

३) आई मुलाला निजविते.

 

शक्य क्रियापद

                  एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य म्हणजे क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे असे ज्या क्रियापदामधून व्यक्त होते, त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात.

 

उदा :

१) आईला आता काम करवते.

२) मला आता खाववते.

३) आता कुत्र्याला पळवते.

 

अनियमित किंवा गौण क्रियापद

                  ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही, अशा क्रियापदांना अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतात.

(उदा. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये इ.)

१) मला पुस्तक पाहिजे.

२) बाबा ऑफिसात नाहीत.

३) असे वागणे बरे नाही.

 

भावकर्तृक क्रियापद 

                   जेव्हा क्रियापदाच्या वाक्यात कर्ता नसून क्रियापदाचा भाव हाच कर्ता असते त्यास भावकर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद म्हणतात.

उदा :

१) गावी जाताना बोरगाव जवळ उजाडले. (उजेड झाला)

२) आज दिवसभर सारखे गडगडतेय. (गडगड होते)

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा