सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

गुगल क्लासरूम प्रशिक्षण , २३ व २४ डिसेंबर २०२१

 



दिनांक  २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी होणारे ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण


                 कोरोना विषाणूच्या  प्रादुभावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला .  यानुसार संदर्भ क्रमांक.२ अन्वये प्रथम टप्पप्पयामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत . तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.

                    विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचेमूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the

Classroomया विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर , २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या युट्युब लिंक्स व QR कोड खालीलप्रमाणे

शासकीय परिपत्रक वाचा - 

 


३ टिप्पण्या: