सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

बोधकथा , परोपकार

 

परोपकार 

                     एकदा एका गुरूच्या आश्रमात तीन मित्र अध्यात्माचे शिक्षण घेत होते. गुरूंनी त्यांना अनेक विद्या शिकविल्यावेगवेगळ्या प्रकारचे.शिक्षण दिले. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झालेतेव्हा ते तिघे गुरूंची आज्ञा घेऊन घरी जाण्यास निघाले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांना रस्त्यात बरेचसे काटे पडलेले दिसले. तेव्हा पहिला शिष्य म्हणालाआपल्याला या काट्यापासून स्वतःचे रक्षण करावे लागेल आणि तो हळूहळू पाय टाकत पलीकडे गेला.दुसरा शिष्य खेळाडू वृत्तीचा होता. त्याने लांब उड्या टाकत काटे पार केले

                             परंतु तिसऱ्याने तसे न करता सामान खाली ठेवले व रस्त्यातील काटे उचलून त्याने बाजूला केले व रस्ता साफ केलाआणि त्यावेळेस त्याच्या हातात-पायात काटे टोचलेपण त्याने त्याची पर्वा केली नाही. तेवढ्यात त्यांचे गुरू तेथे आले,आणि ते पहिल्या दोन शिष्यांना म्हणालेतुमचे शिक्षण अजून पूर्णझालेले नाही. तुमची परीक्षा घेण्यासाठी मीच हे काटे रस्त्यात टाकले होते. स्वतः काटे उचलून त्रास सहन करून दुसऱ्यांसाठी मार्ग सुलभ करणे हेच खरे जीवन आहे. तिसऱ्या शिष्याला आशीर्वाद देऊन त्यांनी त्याला घरी जाण्याची अनुमती दिली.

    

            परोपकाराची सवय हे विद्या मिळवण्याचे  मूळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा