केवलप्रयोगी अव्यय
मनातील उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या
अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्यय भावना प्रधान असतात.
१)
हर्षदर्शक :
अहाहा, आ-हा, अहा, वा, वा-वा, ओ-हो
२)
शोकदर्शक :
शिव-शीव, हरहर, देवा रे, रामा रे, अंगाई, आई गं,
हाय, हायहाय, ऊ, अं, अरेरे
३)
आश्चर्यदर्शक :
ऑ, ओहो, अबब, अहाहा, बाप रे, ओ, अरेच्चा
४)
प्रशंसादर्शक :
छान, वाहवा, भले, शाब्बास, यव, चॅन, ठीक, फक्कड, खाशी
५)
संमतीदर्शक :
ठीक, जिहा, जी, हां, बराय, अच्छा
६)
विरोधदर्शक :
छे छे, अहं, उहू, ऊ, हॅट, छट, छे, च
७)
तिरस्कारदर्शक :
धिक, थू, शी, इश्श,
हुडत, हूड, फूस, हात, छत, छी
८)
संबोधनदर्शक :
अगं, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
९)
मौनदर्शक :
चूप, चुपचाप, गप, गुपचूप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा