सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

 

                             


              शब्दाला जोडून येणारे अव्यय. उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे . यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत.

           'काम'शब्दाला 'मुळें' लागण्यापूर्वो 'काम'.चे 'कामा' हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें.

आणखी उदाहरणें :-

          सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.
शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सामान्य रूप ), खालीं ( शब्दयोगी अव्यय )
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या (सारू),जवळ (श.अ.)

                  शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.

                  शब्दयोगी अव्यय हें अ-व्यय असल्याने त्यामध्यें लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

                  शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होतें.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार आहेत.  -

कालवाचकआधीं, नंतर, पर्यंत, पावेंतों, पुढें, पूर्वीं
गतिवाचक - आंतून, खालून, पर्यंत, पासून, मधून
स्थलवाचकअलीकडे, आत, जवळ, ठायीं, नजीक, पाशींपुढें, बाहेर, मध्यें, मागें, समोर
करणवाचककडून, करवीं,करून, द्वारां, मुळे, योगे, हातीं
हेतुवाचकअथा, करिता, कारणें, निमित्त, प्रीत्यर्थ, साठीं, स्तव
व्यक्तिरेखा वाचक खेरीज, परतां, वाचून, विना, व्यक्तिरिक्त, शिवाय
तुलनावाचकतम, तर, परीस, पेक्षा, मध्ये
योग्यतावाचकप्रमाणें, बरहुकूम, सम, समान, सारखा, योग्य
कैवल्यवाचककेवळ, ना, पण, फक्त, मात्र
संग्रहवाचककेवळ, देखील, पण, फक्त, बारीक, सुद्धा, ही
संबंधवाचकविशीं, विषयीं
साहचर्यवाचक बरोबर, सह, संगें, सकट, सहित, सवें, निशी, समवेत
भागवाचकआतून, पैकीं, पोटीं
विनिमयवाचकऐवजी, जागी, बदली, बद्दल
दिकवाचककडे, प्रत, प्रति, लागी
विरोधावाचकउलटविरुद्ध, वीण
परिणाम वाचक भर

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा